Wednesday, March 12, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : साडीचा पदर पिठाच्या गिरणीच्या पट्ट्यात अडकून महिला ठार

इचलकरंजी : साडीचा पदर पिठाच्या गिरणीच्या पट्ट्यात अडकून महिला ठार

पिठाच्या गिरणीच्या पट्ट्यात साडीचा पदर अडकून कबनूर येथील रूपाली बाबासो आडसुळे (वय ४८, रा. दत्तनगर) या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार रात्रीच्या सुमारास घडली.याबाबत शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रूपाली आडसुळे व त्यांचे पती बाबासो आडसुळे यांची दत्तनगर, गल्ली क्रमांक ६ मध्ये पिठाची गिरणी आहे. रूपाली आडसुळे या गिरणीमध्ये दळप दळून देत असताना त्यांच्या साडीचा पदर अचानकपणे गिरणीच्या पट्ट्यात अडकल्याने त्यांचे डोके जमिनीवर जोरदारपणे आपटले.

त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना कबनूरमधील एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. रूपाली आडसुळे यांच्या मागे पती, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. घटनेची वर्दी बाबासो आडसुळे यानी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -