चंदुर-आभार फाटा न परिसरामध्ये पावरलूम वेस्टच्या – गोदामास आग लागून सुमारे तीन न लाखाचे नुकसान झाले. आगीची न माहिती मिळताच इचलकरंजी, हातकणंगले, कोल्हापूर व जवाहर साखर कारखाना यांच्या अग्निशमन दलाने आग न आटोक्यात आणली.
चंदूर आभार फाटा परिसर रुइ हद्दीमध्ये गट नंबर ७८१ मध्ये गोडाऊन आहे. यामध्ये भाडेकरू रोहित केसरवानी यांचा आर. के. ट्रेडर्स या फर्मचा पावरलूम वेस्ट व्यवसाय आहे.
सायंकाळच्या सुमारास गोडांवूनमधून अचानक धूराचे लोट बाहेर आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.