Monday, July 28, 2025
Homeक्रीडादेव न करो पण दुबईत काही अनर्थ घडला अन् फायनल सामना रद्द...

देव न करो पण दुबईत काही अनर्थ घडला अन् फायनल सामना रद्द झाला, तर कोण होणार चॅम्पियन? जाणून घ्या ICCचा नियम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रविवार 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे. हा विजेतेपदाचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

 

हा स्पर्धेचा नववा हंगामा आहे, जो पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळला जात आहे. भारत अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे जेतेपदाचा सामना दुबईमध्ये खेळला जात आहे.

 

पाकिस्तानमध्ये पावसामुळे स्पर्धेतील अनेक सामने रद्द करण्यात आले होते, परंतु दुबईमध्ये अद्याप असे झालेले नाही. पावसाची शक्यता असली तरी, खेळात अद्याप व्यत्यय आलेला नाही. दुबईत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ शेवटच्या साखळी सामन्यात एकमेकांशी भिडले होते, जिथे टीम इंडियाने किवी संघाचा पराभव केला होता.

 

जर पावसामुळे सामना रद्द झाला तर कोण होणार विजेता?

 

दुबईमध्ये आतापर्यंत पावसामुळे सामना व्यत्यय आणला नसला तरी, जर फायनल सामन्यात पाऊस पडला आणि मॅच रद्द करावी लागली, तर अशा परिस्थितीत कोणत्या संघाला विजेता घोषित केले जाईल? याबाबत आयसीसीचा नियम अगदी स्पष्ट आहे. जर अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडला तर षटकांची संख्या कमी करून सामना खेळवता येईल. आयसीसीच्या नियमांनुसार, अंतिम सामन्यात किमान 20 षटके खेळणे आवश्यक आहे. प्रत्येक संघाला 20-20 षटके दिली जातील. पावसामुळे प्रभावित झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये षटकांची कपात नियोजित वेळेनंतर सुरू होते.

 

रविवारी दुबईतील हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, AccuWeather च्या अहवालानुसार 9 मार्च रोजी दुबईमध्ये पावसाची शक्यता नाही. आणि जर पावसामुळे तरीही खेळवता आला नाही तर सामना राखीव दिवशी पूर्ण होईल. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यासाठी 10 मार्च हा राखीव दिवस ठेवला आहे.

 

सुपर ओव्हरमध्ये होणार चॅम्पियनचा निर्णय

 

जर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना अनिर्णित किंवा बरोबरीत सुटला, तर चॅम्पियन म्हणजेच विजेता सुपर ओव्हरमध्ये ठरवला जाईल. सुपर ओव्हरच्या नियमांनुसार, दोन्ही संघांना प्रत्येकी एक षटक खेळण्याची संधी मिळते.

 

न्यूझीलंडविरुद्ध 25 वर्षांचा जुना हिशोब चुकता करणार टीम इंडिया?

 

भारतीय संघाने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात बांगलादेश आणि नंतर पाकिस्तानला हरवले. यानंतर, गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडला पराभूत केले.

 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात, भारत आणि न्यूझीलंडचे संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आमनेसामने येत आहेत. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत यापूर्वी 2000 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता, आता त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.

 

पावसाचा टीम इंडियाला बसला आहे दणका!

 

पावसाचा टीम इंडियाला बसला आहे दणका!

 

भारतीय संघाला अंतिम सामन्यात पावसाचा दणका बसला आहे. 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंका यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नाही आणि नंतर आयसीसीच्या नियमांनुसार भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.

 

भारत आणि न्यूझीलंड संघ

 

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.

 

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, जेकब डफी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -