Tuesday, March 11, 2025
Homeब्रेकिंगराज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा 

राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा 

, राज्यात बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचे चित्र बघायला मिळात आहे. परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण व दमट हवामानाला समोर जावं लागत आहे. अशातच वैदर्भीय लोकांची काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) आज 11, 12 आणि 13 मार्चला विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा(IMD Forecast) दिला आहे. 12 आणि 13 मार्चला चंद्रपूर जिल्ह्यात देखील हिट व्हेवचा इशारा हवामान विभागाने दिला असून संभाव्य उष्णतेच्या लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

चंद्रपूर, अकोल्याचे तापमान 40 अंश पार जाण्याची शक्यता

 

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्याचा पारा 37 डिग्रीच्या पार पोहचला आहे. अशातच आजपासून पुढच्या दोन तीन दिवसात चंद्रपूर, अकोल्याचे तापमान 40 अंश पार जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर यंदा सामान्यपेक्षा 3 ते 4 डिग्रीने पारा वाढणार असल्याचे ही सांगितलं जातंय. साधारण 36 डिग्रीपर्यंत मार्च महिन्यात विदर्भातील तापमान असतो. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने सामान्यपेक्षा अधिक पारा गाठल्याने आगामी काळात उष्णतेनं शहरं आणखी तापण्याची शक्यता आहे. परिणामी हवामान विभागाने आगामी काळासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 

राज्यभरात तापमानाचा भडका! हवामान विभागाचा अंदाज काय?

दुसरीकडे, राज्याच्या तापमानात ही मोठी वाढ झाली असून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक प्रमुख शहरांमधील तापमान वाढलं असून मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत सोमवारी 37.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद, तर ठाण्यात तापमान 38 अंशांवर गेल्याचे बघायला मिळाले. कुलाब्यात देखील तापमानच पारा 36.4 अंश सेल्सिअस होतं. मुंबईतील सरासरी तापमानापेक्षा 5 अंश सेल्सिअस तापमान अधिक असल्याचे निदर्शनात आले आहे. अशातच, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रासोबतच मुंबई महापालिकेकडून बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

नंदूरबारमध्ये 39.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. तर पुण्यात देखील तापमान 37 अंशांपर्यंत पोहोचलंय. पुण्यात काल (10 मार्च)36.9 अंशांची नोंद करण्यात आली आहे.पुण्यातील कोरेगाव पार्कात सर्वाधिक 39.6 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. विदर्भातील अकोल्यात तापमान 38.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. तर कोकणात आज (11 मार्च) वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागकडून वर्तविण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -