Tuesday, March 11, 2025
Homeमहाराष्ट्रमुली आवडतात म्हणून थेट घरात शिरला… रिक्षावाल्याने शाळकरी मुलींचा हात धरला आणि..

मुली आवडतात म्हणून थेट घरात शिरला… रिक्षावाल्याने शाळकरी मुलींचा हात धरला आणि..

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याणमध्ये पुन्हा एकदा भयानक गुन्हा घडल्याचे समोर आले आहे. कधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या, कधी परप्रांतीयांकडून मारहाण यामुळे कल्याण बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्यातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे कल्याणकर हादरले असून संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भयानक घटना घडली आहे. तेथे एका रिक्षा चालकाने घरात शिरून दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचे उघडकीस आलं आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत पवार असे नराधम आरोपीचे नाव आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे मुली आवडतात म्हणून तो थेट त्यांच्या घरात शिरला आणि मुलींचा विनयभंग केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कतल्याण तालुका पोलीसानी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

 

नेमकं काय घडलं ?

टिटवाळा परिसरात एकीकडे भर रस्त्यात एक विवाहित महिलेच्या पतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग करून तिचे कपडे फाडत नग्न करायचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हेमंत पवार नावाच्या एका रिक्षा चालकाने घरात शिरून दोन शाळकरी अल्पवयीन बहिणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “मुली आवडतात म्हणून” या रिक्षा चालकांनी भर दिवसा घरात शिरून दोन्ही विद्यार्थिनीचा विनयभंग केला या प्रकरणी कल्याण तालुका टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अवघ्या काही तासात या रिक्षा चालकाला बेड्या ठोकत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटने मुळे परिसरात भीतीचे वातावरण असून सतत वाढत्या गुन्हेगारीमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

 

कोणाला सांगितलं तर शाळेतून उचलून नेईन… दिली धमकी

 

रविवारी संध्याकाळी एका घरात घुसून दोन शाळकरी अल्पवयीन मुलांचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. विनयभंग केल्यानंतर घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुम्हा दोघींना मी शाळेमधून उचलून नेईन, अशी धमकी दिली होती. शाळेत जाताना पाठलाग करत आरोपी घरात शिरला त्यावेळी त्याला तू घरात का आलास, असा जाब विचारला. त्यावेळी त्याने तु मला खूप आवडतेस, असे बोलून त्या इसमाने बालिकेचा हात पकडला. बालिकेने त्याचा झटकला. त्याला घरातून निघून जाण्यास सांगितले. हा प्रकार सुरू असताना पीडितेची अल्पवयीन मावस बहिण घरात आली. तिने घरात काय सुरू आहे, असा प्रश्न केला. त्यावेळी इसमाने मावस बहिणीच्या खांद्यावर हात टाकून तिलासुद्धा तू मला खूप आवडतेस, असे बोलून तिला हाताला पकडून स्वयंपाक घरापर्यंत ओढत नेले. आणि आम्हा दोघींना घरात घडलेला प्रकार तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना सांगितला तर तुम्हाला तुमच्या शाळेमधून उचलून घेऊन जाईन अशी धमकी दिली. त्यानंतर तो घरातील सोफ्यावर जबरदस्तीने झोपला. या घडल्या प्रकाराने पीडित दोन्ही बहिणी घाबरल्या होत्या. एका पीडितेची आई रात्री मजुरी करून घरी आली. त्यावेळी तिने घरात घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने दोन्ही पीडित बालिकांसह टिटवाळा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने हा गुन्हा दाखल करून घेतला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव यांनी सुरू केला आहे.

 

विनयभंग करणारा इसम हा कल्याण तालुक्यातील घोटसई गावातील असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. एक पीडित तरूणी 14 वर्षाची तर एक 12 वर्षाची आहे. पीडितेचे कुटुंब मजुरी करून उपजीविका करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -