Friday, July 25, 2025
Homeमहाराष्ट्रEPFO चे 3 मोठे बदल; प्रत्येक कर्मचार्‍यांसाठी खास खबर, असा होईल परिणाम

EPFO चे 3 मोठे बदल; प्रत्येक कर्मचार्‍यांसाठी खास खबर, असा होईल परिणाम

ईपीएफओने कात टाकली आहे. येत्या काही महिन्यात कर्मचारी थेट एटीएम अथवा युपीआयच्या माध्यमातून पीएफ रक्कम काढू शकतील. आता महिना महिना प्रक्रियेत अडकून पडावे लागणार नाही.

 

EPF (Employees Provident Fund) सदस्यांना EDLI (Employees Deposit Linked Insurance) योजनेतंर्गत सामाजिक सुरक्षेचे कव्हर मिळेल. या योजनेतंर्गत तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे.

 

जर कर्मचारी नोकरीच्या पहिल्याच वर्षी मरण पावला. त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदारांना आता 50,000 रुपये विमा योजनेतंर्गत मिळतील. प्रत्येक वर्षी जवळपास 5,000 कुटुंबांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी असा फायदा मिळत नव्हता.

 

जर एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी गेली आणि काही महिन्यातच त्याचा मृत्यू ओढावला तर त्याच्या कुटुंबियांना EDLI योजनेचा लाभ मिळत नव्हता. नवीन नियमानुसार, ईपीएफमध्ये योगदानानंतर 6 महिन्यात कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला विमा रक्कम मिळेल. पण त्याचे नाव पे मस्टरवर असणे आवश्यक आहे.

 

नोकरी सुटल्यानंतर दुसरी नोकरी मिळेपर्यंत, मधले दिवस ग्राह्य धरले जात नसत. आता दोन महिन्यांचा ब्रेक ग्राह्य धरण्यात येणार आहे. या काळातील सेवा सलग मानण्यात येईल. त्यातंर्गत कर्मचाऱ्यांना विमा योजनेचा लाभ सुरू असेल.

 

आता वारसदारांना कमीत कमी 2.5 लाख रुपये तर जास्तीत जास्त 7 लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम मिळेल. सध्या ईपीएफवरील बचत रक्कमेवर 8.25 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -