साने गुरुजी विद्यामंदिर देगांव येथील दहावीची विद्यार्थिनी सुनेरा शादुल शेख रा.देगाव (वय १५) हिचे अल्पशा आजाराने निधन झाले. वडीलांसोबत बसुन अभ्यास करत असताना वडिलांच्या मांडीवरच तिने अखेरचा श्वास घेतला.
विज्ञान विषयाच्या पेपरचा अभ्यास करत असताना अचानक ती कोसळली अन् सुनेराचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना 12 मार्च बुधवारी सकाळी घडली. शेख परिवारासह गावकऱ्यांवर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साने गुरुजी विद्या मंदिर ही या घटनेने दुःख सागरात बुडाले.
संपूर्ण शाळेतील गुणवंत विद्यार्थींनींपैकी सुनेरा ही एक शांत स्वभावाची विद्यार्थीनी होती. तिने या आधीचे सर्व पेपर आतीशय सुंदर सोडवले होते. आजच्या पेपरची पूर्ण तयारी करुन बसली असता. सकाळी ७ वाजता शेवटची नजर पुस्तकावर टाकताना तिचे अचानक निधन झाले.
तिच्या पध्छात आई, वडील, दोन भाऊ असा परीवार आहे. शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तिला श्रध्दाजंली अर्पण केली. या घटनेने शाळेतील सर्व मुले, मुली भावूक झाले होते. विद्यार्थिनी गेल्याचे दुःख शिक्षकांवर तर मैत्रिन गेल्याचे दुःख सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते. अनेक जन ओक्साबोक्सी रडत होते. शाळेच्या इतिहासात शिक्षणाची परीक्षा देतना जीवनाची परीक्षा हरणारी सुनेरा ही अनेकांच्या काळजाला हूर हूर लावून जग सोडून गेली.