Thursday, July 3, 2025
Homeक्रीडामुंबई विरुद्ध गुजरात यांच्यात फायनलमध्ये पोहचण्यासाठी चुरस, फायनलमध्ये कोण पोहचणार?

मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यात फायनलमध्ये पोहचण्यासाठी चुरस, फायनलमध्ये कोण पोहचणार?

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसऱ्या हंगामातील (WPL 2025) साखळी फेरीची सांगता झाली आहे. दिल्लीने सलग आणि थेट तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर गुरुवारी 13 मार्चला अंतिम फेरीत कोण पोहचणार? हे निश्चित होणार आहे. गुरुवारी मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. हरमनप्रीत कौर हीच्याकडे मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर एश्ले गार्डनर गुजरात जायंट्सचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होईल. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये होणार आहे.

 

दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने

मुंबई विरुद्ध गुजरात दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध खेळले होते. मुंबईने या दोन्ही सामन्यात गुजरातला चितपट केलं होतं. त्यामुळे या हंगामातील कामगिरी पाहता मुंबई गुजरातवर वरचढ आहे. त्यामुळे एलिमिनेटरमध्ये गुजरातवर मात करत मुंबईकडे हॅटट्रिक पूर्ण करण्यासह अंतिम फेरीत पोहचण्याची दुहेरी संधी असणार आहे. तर गुजरातकडे मुंबईवर मात करुन दोन्ही पराभवांची परतफेड करण्याची संधी आहे.

 

मुंबई गुजरातवर वरचढ

दरम्यान मुंबई या स्पर्धेच्या इतिहासात गुजरातवर वरचढ राहिली आहे. उभयसंघात आतापर्यंत एकूण 6 वेळा आमनासामना झाला आहे. मुंबईने त्या सर्वच्या सर्व 6 सामन्यात विजय मिळवला आहे.

 

पलटण एलिमिनेटरसाठी सज्ज

मुंबई इंडियन्स वू्मन्स टीम: हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया, अमनदीप कौर, अक्षिता माहेश्वरी, जिंतिमणी कलिता, सायका इशाक, कीर्थना बालकृष्णन, नादिन डी क्लर्क आणि क्लो ट्रायॉन.

 

गुजरात जायंट्स वूमन्स टीम : ॲशले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, हरलीन देओल, डिआंड्रा डॉटिन, फोबी लिचफिल्ड, काशवी गौतम, भारती फुलमाली, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, लॉरा वोल्वार्ड, डॅनियल गिब्सन, सिमरन शेख, मन्नत कश्यप, शबनम एमडी शकील, प्रकाशिका नाईक आणि सायली सातघरे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -