Thursday, March 13, 2025
HomeBlogइचलकरंजी : रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

इचलकरंजी : रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या १५ मार्च रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध उपक्रमांनी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यंकोबा मैदान येथे शनिवार ५ एप्रिल रोजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांचे भव्य कुस्ती मैदान शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री दिपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे, माजी मंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
१५ मार्च रोजी इचलकरंजी शहर शिवसेनेच्या वतीने तोरणानगर येथील अनाथ आश्रमात मुलांना खाऊ वाटप, किल्ले पन्हाळगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक, शाहवाडी येथे शिवसेनेच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा, अब्दुललाट येथे अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप, जयसिंगपूर येथे रक्तदान शिबिर, हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप, वडगाव ग्रामीण  रुग्णालयात आरोग्य शिबिर तर इचलकरंजीत युवासेना व महिला आघाडी यांच्या वतीने मूकबधिर शाळेत मुलांना व इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -