Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रएक्सप्रेससमोर धान्याने भरलेला ट्रक आला; मोठा अपघात

एक्सप्रेससमोर धान्याने भरलेला ट्रक आला; मोठा अपघात

महाराष्ट्रात संपूर्ण होळीचा उत्साह साजरा करण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान रेल्वे आणि ट्रकचा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाच्या जवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर ट्रक आल्याने मोठा अपघात झाला.

 

सुदैवाने या अपघातमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

बोदवड नाढगावजवळ रेल्वे गेट तोडून एक धान्याने भरलेला एक ट्रक अडकून पडलेला होता.

 

आज सकाळी 4.30 वाजताच्या सुमारास मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या अमरावती एक्सप्रेसची धडक या ट्रकला बसल्याने अपघात झाला.

 

रेल्वे चालकाने दाखविलेल्या सूचकतेमुळे रेल्वेची गती अतिशय कमी होती.

 

अपघात झाला असला तरी जीवितहानी मात्र झाली नसल्याची सध्या माहिती आहे.

 

अपघात झालेला ट्रक रेल्वेत अडकून पडला असल्यानं त्याला काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

 

बोदवडजवळ झालेल्या ट्रक आणि अमरावती एक्सप्रेसच्या अपघातामुळे नागपूर भुसावळ रेल्वे वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाल्या आहेत.

 

अनेक प्रवासी गाड्या मलकापूर ,नांदुरा, शेगाव, अकोला स्थानकात अडकल्या. सणासुदीच्या दिवशी रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -