Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रतुम्हाला ठाऊक आहेत का? जिओचे 'हे' ५ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून...

तुम्हाला ठाऊक आहेत का? जिओचे ‘हे’ ५ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या

तुम्ही सुद्धा डेटा आणि फ्री कॉलिंगच्या गरजेसाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन शाधत असाल आणि रिलायन्स जिओचे प्रीपेड सिम वापरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण कंपनीकडे तुमच्यासाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन आहेत.

 

आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त असलेले 5 जिओ प्रीपेड प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, या प्लॅन्सची किंमत आणि वैधता काय आहे ते आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

 

माहितीच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छीतो की, सर्वात स्वस्त जिओ प्लॅन हे डेटा पॅकच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. सर्वात स्वस्त जिओ रिचार्ज प्लॅनची किंमत 11 रुपयांपासून सुरू होते.

 

हे आहेत सर्वात स्वस्त रिलायन्स जिओ रिचार्ज प्लॅन

 

Jio 11 Plan: या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला १ तासाच्या वैधतेसह 10 जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो. डेटा मर्यादा संपल्यानंतर डेटाचा स्पीड 64 kbps पर्यंत कमी केला जाईल.

 

Jio 19 Plan: 19 रूपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला रिलायन्स जिओकडून 1जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा मिळेल, परंतु लक्षात ठेवा की हा प्लॅन 1दिवसाच्या वैधतेसह येतो.

 

Jio 29 Plan: जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल तर तुम्ही 29 रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता. या प्रीपेड प्लॅनमध्ये 2 दिवसांच्या वैधतेसह 2 जीबी हाय स्पीड डेटा मिळतो.

 

Jio 49 Plan:रिलायन्स जिओच्या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 दिवसाच्या वैधतेसह 25 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. जर तुम्ही वैधता संपण्यापूर्वी सर्व डेटा वापरला तर स्पीड 64kbps पर्यंत कमी होईल.

 

Jio 69 Plan: 69 रूपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला 7 दिवसांच्या वैधतेसह 6 जीबी हाय स्पीड इंटरनेटचा लाभ देईल. लक्षात ठेवा की हे सर्व डेटा पॅक आहेत, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएस सुविधा मिळणार नाही.

 

70 रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्हाला रिलायन्स जिओचा डेटा, कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्स असलेला कोणताही प्लॅन मिळणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -