भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या पाठीला बॉर्डर (suffered)गावसकर ट्रॉफी दरम्यान दुखापत झाली होती. यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुद्धा मुकला होता. त्यानंतर आयपीएल 2025 मध्ये सुद्धा बुमराहच्या खेळण्यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. सध्या तो बंगळुरूच्या एनसीएमध्ये उपचार घेत असून त्याने सरावाला सुरुवात सुद्धा केलीये. अद्याप बुमराह पूर्णपणे फिट आहे की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार बुमराह हा मार्चमध्ये होणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना मुकणार असून एप्रिल महिन्यापासून आयपीएल सामने खेळण्यासाठी उतरेल.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली असून त्यावर सर्जरी करण्यात आली. यातून आता सॅमसन पूर्णपणे बरा झाल्याची माहिती असून त्याला एनसीएतून सोडण्यात येणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेत खेळणाऱ्या सॅमसनने त्याच्या फलंदाजीसाठी फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली होती, परंतु त्याला अजूनही एनसीएमध्ये विकेटकीपिंगच्या चाचण्या द्यायच्या आहेत. त्यामुळे संजू आयपीएल खेळण्यासाठी उतरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संजू सॅमसन ऐवजी (suffered)ध्रुव जुरेल हा राजस्थान रॉयल्ससाठी विकेटकिपर म्हणून आयपीएलचे काही सामने खेळेल.
वेगवान गोलंदाज मयंक यादव हा आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकू शकतो. मयंक लखनऊ सुपर जाएंट्सचा खेळाडू असून तो कंबरेला झालेल्या दुखापतीतून बरा होत आहे आणि तो बेंगळुरूमधील बीसीसीआयच्या रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेतोय.लखनऊ सुपर जाएंट्सचा आणखीन एक गोलंदाज सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे बीसीसीआयच्या रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेतोय. क्रिकबझच्या वृत्तानुसार जानेवारीमध्ये केरळविरुद्ध मध्य प्रदेशचा शेवटचा रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान आवेशला ही दुखापत झाली होती.
लखनऊ सुपर जाएंट्सचा अजून एक गोलंदाज मोहसीन खान हा सुद्धा दुखापतीने त्रस्त आहे. याच्या दुखापतीबाबत फारशी माहिती मिळाली नसली त्यामुळे त्याच्या खेळण्यावर अजूनही स्पष्टता (suffered)नाही.मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या हा आयपीएल 2024 मधील लखनऊ विरुद्ध सामन्या दरम्यान स्लो ओव्हर रेट नियमानुसार दोषी आढळला होता. त्यामुळे हार्दिकवर एका सामन्याचा बॅन लागणार आहे. म्हणून 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणाऱ्या पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्या खेळताना दिसणार नाही. मात्र इतर सर्व सामन्यांसाठी तो उपलब्ध असेल.
आयपीएल 2025 चा पहिला सामना हा गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. यंदा आयपीएल 2025 मध्ये एकूण 10 संघांचा सहभाग आहे.