Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्रसोने ओलांडणार लाखाचा टप्पा? का वाढली चमक, का झाले महाग? चांदीचा भाव...

सोने ओलांडणार लाखाचा टप्पा? का वाढली चमक, का झाले महाग? चांदीचा भाव जाणून घ्या

सोने आणि चांदीने अशी काही धुळवड खेळली की ग्राहकांचे रंगलेले चेहरे सुद्धा उतरले आहेत. त्यांचा रंगच उडाला आहे. त्यांचा रंग फिक्का झाला आहे. येत्या काही दिवसात सोने खरेदी करावे की नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. या वर्षी जानेवारी ते मार्चमधील सोने आणि चांदीचा भाव अनेकांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. सोन्याने जवळपास 16 हजारांची झेप घेतली आहे. तर चांदीने पण किलोमागे मोठी झेप घेतली आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…

 

सोन्यात तुफान वाढ

 

या आठवड्यात सोन्याने ग्राहकांचे डोळे पांढरे केले. एक दिवस वगळता इतर दिवशी दरवाढीचे सत्र दिसून आले. पहिल्या दिवशी सोने 110 रुपयांनी वधारले. मंगळवारी 330 रुपयांनी भाव कमी झाले. बुधवारी 490 रुपये, गुरूवारी 600 आणि 120 रुपयांनी सोने महागले. तीन दिवसात सोन्याने 1200 रुपयांचा टप्पा गाठला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

चांदीने ओलांडला लाखांचा टप्पा

 

या दोन आठवड्यात चांदीने मोठी मुसंडी मारली. पहिल्या दोन दिवसात चांदी 1100 रुपयांनी स्वस्त झाली. बुधवारी 2 हजार, गुरूवारी 1 हजार तर शुक्रवारी 2 हजारांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,03,000 रुपये इतका आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

 

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,843, 23 कॅरेट 86,495 22 कॅरेट सोने 79,548 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 65,132 रुपये, 14 कॅरेट सोने 50,803 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,322 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

 

सोने का झाले महाग?

 

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणामुळे ट्रेड वॉर भडकले

 

देशात विवाह सोहळे सुरू आहेत. सोन्याची मागणी वाढली आहे

 

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सातत्याने घसरत आहे

 

जागतिक बाजाराला महागाईचे चटके बसत आहे. सोन्यात गुंतवणूक वाढली आहे

 

शेअर बाजाराने धोका दिल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे वळाले आहेत.

 

परिस्थिती अशीच राहिल्यास सोने लाखाचा टप्पा पार करणार

 

घरबसल्या जाणून घ्या भाव

 

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -