Friday, July 4, 2025
Homeमहाराष्ट्रकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'या' तारखेपासून लागू होणार 8 वा वेतन आयोग

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेपासून लागू होणार 8 वा वेतन आयोग

देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या वेतनात मोठी वाढ मिळणार आहे.

 

मात्र, त्याची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होईल, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

 

आठवा वेतन आयोग आणि वेतनवाढ

 

आठव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरनुसार वाढणारआहे.

याआधी अहवाल होते की 1 जानेवारी 2026 पासून अंमलबजावणी होईल, परंतु अलीकडील माहितीनुसार काही विलंब होऊ शकतो.

सरकारने अद्याप वेतन आयोगाच्या अंतिम अटी जाहीर केलेल्या नाहीत, त्यामुळे अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

 

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करणे आव्हानात्मक ठरू शकते. परंतु केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की सरकारकडे पुरेसा वेळ आहे, आणि आयोगाच्या अंमलबजावणीसाठी लवकरच प्रक्रिया सुरू होईल.

 

भारताचा पहिला वेतन आयोग 1946 मध्ये स्थापन झाला होता.

सातवा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता आणि त्याचा कालावधी 2026 मध्ये संपणार आहे.

त्यामुळे पुढील वर्षासाठी आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया या वर्षात सुरू होईल.

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होणार?

 

फिटमेंट फॅक्टर 2.08 असल्यास

किमान मूळ वेतन ₹18,000 → ₹37,440

पेन्शन ₹9,000 → ₹18,720

 

फिटमेंट फॅक्टर 2.86 असल्यास

किमान मूळ वेतन ₹18,000 → ₹51,480

पेन्शन ₹9,000 → ₹25,740

 

सरकारी निर्णयाची प्रतीक्षा

 

आता आठव्या वेतन आयोगाच्या अंतिम अंमलबजावणीची अधिकृत घोषणा केंद्र सरकारकडून केली जाईल. कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असल्याने सर्वांनाच याची उत्सुकता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -