नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET PG 2025 ची तारीख जाहीर केली आहे. यावर्षी NEET PG 2025 ची परीक्षा 15 जून 2025 रोजी होणार आहे. NEET PG परीक्षा दोन शिफ्टमध्ये संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये घेतली जाईल.
अधिकृत सूचनेनुसार, परीक्षेशी संबंधित माहिती NBEMS वेबसाइट natboard.edu.in वर वेळोवेळी अपडेट केली जाईल.
NBEMS ने आपल्या अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, “NEET-PG 2025 ची परीक्षा 15 जून 2025 रोजी दोन शिफ्टमध्ये संगणक आधारित चाचणी (CBT) स्वरूपात घेतली जाईल. परीक्षेशी संबंधित माहिती आणि माहिती बुलेटिन NBEMS वेबसाइट natboard.edu.in वर वेळेत प्रसिद्ध केले जाईल.”
दरम्यान, NEET PG परीक्षा म्हणजे “National Eligibility cum Entrance Test for Postgraduate” परीक्षा. ही एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे, जी भारतातील डॉक्टरांसाठी पोस्टग्रॅज्युएट (PG) मेडिकल कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असते. यामध्ये एमडी (MD), एमएस (MS), डिप्लोमा (Diploma) आणि इतर काही पोस्टग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेसचा समावेश होतो.
NEET PG परीक्षा मुख्यतः त्यांना असते ज्यांनी MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery) पूर्ण केली आहे आणि जे आपल्या करिअरमध्ये पुढे जाऊन स्पेशलायझेशन (MD, MS, किंवा Diploma) शिकू इच्छित आहेत. परीक्षा पास करून, उमेदवारांना संबंधित कोर्सेसमध्ये प्रवेश मिळवता येतो, जो देशभरातील विविध सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेजेसमध्ये असतो.