Thursday, July 24, 2025
Homeमहाराष्ट्रमामाच्या गावाला जायला निघाला, पण... बस स्थानकात अघटित घडलं, 8 वर्षांच्या रुद्रचा...

मामाच्या गावाला जायला निघाला, पण… बस स्थानकात अघटित घडलं, 8 वर्षांच्या रुद्रचा भयानक शेवट

शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे आई आणि बहिणीसोबत मामाच्या गावाला निघालेल्या 8 वर्षांच्या चिमुरड्याचा बसने चिरडल्यामुळे मृत्यू झाला आहे. रुद्र हरिश्चंद्र मोरे असं या मुलाचं नाव आहे.

 

रुद्र शहादा तालुक्यातील मंदाणे गावाचा रहिवासी आहे.

 

साक्री येथे मामाच्या गावाला जायचे असल्यामुळे रुद्र आई आणि बहिणीसोबत मंदाणे येथून शहादा बस स्थानकात आला. शहादा बस स्थानकात तिघेही बसची वाट पाहत होते. अशातच नियमित फेरीला असणाऱ्या बसने रिव्हर्स घेताना रुद्रला चिरडलं, यामुळे तो खांब आणि बसमध्ये अडकला. यामध्ये रुद्रच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर रुद्रला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी रुद्रला मृत घोषित केलं.

 

शहादा बस स्थानकात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी चालक आणि वाहकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तसंच चालक वाहनही पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आहे. रुद्रच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाने रुग्णालयात आक्रोश केला. रुद्रच्या शवविच्छेदनानंतरही महामंडळाचा कुणीही अधिकारी पालकांचं सांत्वन करण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी आला नाही, त्यामुळे मंदाणे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मुलाचा मृतदेह ताब्यात घ्यायला ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -