ओळख आणि मैत्रीचा गैरफायदा घेत युवतीला शिवीगाळ व मारहाण करत कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष महादेव परीट (वय २५ रा. डफळापूर ता. जत) असे त्याचे नाव आहे. पिडीत युवतीने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजीतील युवती व डफळापूर येथील संतोष परीट यांची २०२१ पासून ओळख व मैत्री आहे. त्यातूनच संतोष याने पिडीत युवतीला पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावर भेटण्यासाठी बोलविले. चर्चा सुरु असताना संतोष याने युवतीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.
तसेच कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत ओढणी ओढत हाताला धरुन मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्यातून युवतीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.