शहापूर येथे राहणाऱ्या २२ वर्षीय परप्रांतीय युवकामध्ये गुड़लेन बरे सिंड्रोम (जीबीएस) सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय प्रशासनाने खबरदारी घेत सदर युवकास तातडीने कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात पाठवले आहे.
शहरात कामानिमित्त आलेल्या परप्रांतीय युवकास कांही दिवसापासून अशक्तपणा जाणवत होता. त्याची इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात प्राथमिक तपासणी
केल्यानंतर त्याच्यात जीबीएस सदृश्य काही लक्षणे आढळून आली. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला सीपीआर येथे हलविण्यात आले. जीबीएस हा गंभीर स्वरूपाचा आजार असून त्यामध्ये शरीराचे स्नायू कमकुवत होतात.
काही प्रकरणात पक्षाघात होण्याची शक्यता वर्तविली जाते. हा आजार संसर्गजन्य नसला तरी तो पाणी आणि न शिजलेल्या अन्नावाटे पसरतो. त्यामुळे स्वच्छता आणि पूर्ण शिजलेले अन्न खाणे, या आजारावर त्वरित वैद्यकीय उपचार घेणेत यावेत. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये.