Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रसावधान! QR Code द्वारे पैसे पाठवताना करू नका 'ही' चूक, होईल मोठं...

सावधान! QR Code द्वारे पैसे पाठवताना करू नका ‘ही’ चूक, होईल मोठं नुकसान

स्‍मार्ट फोनमुळे आपल्‍याला अनेक सुविधा मिळत असल्‍या तरी याचे दुष्‍परिणामही आहेत. ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार दररोज नवीन पद्धती वापरून वापरकर्त्यांची फसवणूक करत आहेत.

 

क्यूआर कोड वापरून (QR code Scan) होणारे घोटाळे देखील त्यापैकीच एक आहेत. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर CERT-In (इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय) ने अधिकृत सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म X खात्यावरून काही महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स शेअर केल्या आहेत.

 

फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा

 

CERT-In च्‍या सुरक्षा टिप्सचे पालन करून तुम्ही QR कोडद्वारे फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करू शकता. CERT-In ने त्यांच्या X अकाउंटवरून एक पोस्टर शेअर केला आहे, ज्यामध्ये QR कोड स्कॅन करताना लक्षात ठेवण्याची सूचना केली आहे.

 

‘ही’ काळजी घ्‍या

 

१) कोणताही QR कोड स्कॅन करताना, तो विश्वसनीय स्त्रोताकडून असल्याची खात्री करा.

 

२) QR कोड स्कॅन करताना, तो तुम्हाला कोणत्याही लहान URL वर पुनर्निर्देशित (एखाद्या URL वरून दुसऱ्या URL वर जाणे. याला रीडायरेक्ट असेही म्हणतात.) करत नाही याची खात्री करा.

 

३) सार्वजनिक ठिकाणी असलेल्या QR कोडची काळजी घ्या. अनेकदा, फसवणूक करणारे सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या पोस्टर्सवर बनावट QR कोड चिकटवतात, जे स्कॅन केल्यावर URL वर पुनर्निर्देशित होतात.

 

सायबर फसवणूक झाल्‍यास तक्रारीसाठी १९३० वर डायल करा

 

सायबर फसवणुकीबद्दल तक्रार करण्यासाठी, तुम्ही CERT-In वेबसाइट – www.cybercrime.gov.in ला भेट देऊ शकता. तसेच तुम्ही १९३० वर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. तसेच नियमित अपडेट्ससाठी तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर CERT-In फॉलो करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -