Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रसिकंदर'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित होताच सलमान खानची भविष्यवाणी, म्हणाला, "चित्रपट चांगला असो...

सिकंदर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित होताच सलमान खानची भविष्यवाणी, म्हणाला, “चित्रपट चांगला असो वा वाईट तो.”

सलमान खान, रश्मिका मंदाना स्टारर ‘सिकंदर’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच ‘सिकंदर’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला.

 

काल, २३ मार्चला ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी या चित्रपटासंबंधित सलमान खानची एक भविष्यवाणी केली; ज्याची सध्या चर्चा होतं आहे.

 

ईदचं औचित्य साधून ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्चला प्रदर्शित होणार आहे. २३ मार्चला मुंबईत ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या थाटामाटात झाला. या सोहळ्याला चित्रपटाच्या संपूर्ण टीमने खास हजेरी लावली होती. या सोहळ्यातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘सिकंदर’च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात सलमान खानला बॉक्स ऑफिसवरील कमाईविषयी विचारण्यात आलं. तेव्हा सलमानने जबरदस्त उत्तर दिलं. भाईजानच्या मते चित्रपटाचा दर्जा काहीही असो पण चाहते चित्रपट १०० कोटी पार करतात.

 

सलमान खान म्हणाला, “ईद, दिवाळी, नवीन वर्ष, सण असो किंवा नसो हे लोकांचं प्रेम आहे. चित्रपट चांगला असो वा वाईट चाहते १०० कोटी पार करून टाकतात. पण, १०० कोटी ही खूप आधीची गोष्ट आहे, आता २०० कोटींचा व्यवसाय करून देतात.” सलमानचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला.

 

ट्रेलर लॉन्च सोहळ्यात ‘सिकंदर’चे दिग्दर्शक ए.आर.मुरुगादॉस यांनी स्पष्ट केलं की हा चित्रपट रिमेक नाही. ते म्हणाले, “चित्रपटाची कथा नवीन आणि ओरिजिनल आहे. प्रत्येक सीन आणि फ्रेम विचारपूर्वक केली आहे. जेणेकरून प्रेक्षकांना नवीन अनुभव मिळेल.” जसजसी ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे. तशी प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढत आहे.

 

दरम्यान, ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे. तसंच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘सिकंदर’ चित्रपटासाठी कमाईच्या बाबतीत खूप मोठी संधी आहे. प्रदर्शनाच्या दिवशी ३० मार्चला गुढीपाडवा आहे. सोमवारी ३१ मार्चला ईद साजरी केली जाणार आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी १ एप्रिल व २ एप्रिलला सुट्टी आहे. ४ एप्रिलला वीकेंड सुरू होईल. त्यामुळे ६ एप्रिलपर्यंत सलमान खानचा हा चित्रपट जबरदस्त कमाई करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -