Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगसोन्याची महागाईची गुढी, चांदीने अगोदरच साजरा केला पाडवा, भाव काय आता?

सोन्याची महागाईची गुढी, चांदीने अगोदरच साजरा केला पाडवा, भाव काय आता?

सोने आणि चांदीने गुढी पाडव्याचा मुहूर्त साधला. सोन्यात सलग दुसर्‍या दिवशी मोठी वाढ झाली. सोन्याने महागाईची गुढी उभारली. तर दुसरीकडे चांदीने काल एक हजारांची वाढ नोंदवली. आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीला ब्रेक मिळाला होता. आता पाडव्याच्या मुहूर्तावर सोने पुन्हा 90 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर चांदी अजून लांब पल्ला गाठू शकते. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…

 

सोन्याची महागाईची गुढी

 

या आठवड्यात सोमवार आणि मंगळवारी सोने अनुक्रमे 210 आणि 330 रुपये असे एकूण 540 रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी सोने 110 रुपयांनी तर गुरूवारी 440 रुपयांनी असे एकूण 550 रुपयांनी सोने महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

चांदीची 1000 रूपयांची भरारी

 

21 मार्चपासून चांदी 4100 रुपयांनी स्वस्त झाली. सोमवार, मंगळवारी दोन दिवस किंमती स्थिर होत्या. बुधवारी चांदी 1000 रूपयांनी वधारली. तर गुरुवारी किंमती स्थिर होत्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,02,000 रुपये इतका आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

 

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 88,417, 23 कॅरेट 88,063, 22 कॅरेट सोने 80,990 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,313 रुपये, 14 कॅरेट सोने 51,724 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 99,775 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

 

घरबसल्या जाणून घ्या भाव

 

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -