Saturday, September 30, 2023
Homeक्रीडाजोस बटलरचा सुपरमॅन अवतार! जादुई कॅचचा Video व्हायरल

जोस बटलरचा सुपरमॅन अवतार! जादुई कॅचचा Video व्हायरल

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात धडाकेबाज जोस बटलरने चाहत्यांची मने जिंकली. इंग्लंडचा यष्टिरक्षक बटलर त्याच्या शानदार झेलमुळे चर्चेत आहे. ॲशेस सिरीजच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने एका हाताने हवेत त्याच्यापासून ४ फूट दूर जाणारा चेंडू मोठी झेप घेत पकडला. बटलरने उजवीकडे झेपावत मार्कस हॅरिसचा अप्रतिम झेल टिपला. उजवीकडे झेप घेत असताना कोणत्याही यष्टिरक्षकाला झेल घेणे सोपे नसते. तेही गोळीच्या वेगाने चेंडू बाहेर आल्यावर. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ॲशेस सिरीजमधील दुसरा कसोटी डे नाईट खेळवला जात आहे. सामन्यातील आठवे षटक स्टुअर्ट ब्रॉड टाकत होता. त्याचा सामना डावखुरा मार्कस हॅरिस करत होता. ब्रॉडने षटकातील तिसरा चेंडू राऊंड द विकेटवरून टाकला. हॅरिसच्या लेगसाईडला जात होता. या चेंडूवर हॅरिसने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटची कड घेऊन उजवीकडे गेला. चेंडू लेग स्लिप आणि यष्टीरक्षक यांच्यामधून जात होता, तेव्हा बटलरने चपळाईने उजवीकडे झेपावत एका हाताने चेंडू त्याच्या ग्लोव्हज् मध्ये पकडला. हा एक अप्रतिम, शानदार असा झेल आहे. क्रिकेट सामन्यात असे सुरेख झेप क्वचितच पहायला मिळतात.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र