एस युरोकेअर सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. हा उपक्रम मोफत असून या उपक्रमाद्वारे अनेक रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व औषधोपचार केले जातात. त्याचबरोबर एस युरोकेअर या इचलकरंजीतील हॉस्पिटल कडून इचलकरंजी आणि परिसरात सातत्याने लहान मोठे मूत्राशया संदर्भातील विकार यावरचे तात्काळ व कायमस्वरूपी निवारण होईल अशा प्रकारचे उपचार केले जातात. हे आपणा सर्वांना स्थानिक मंडळींना माहित आहेच.
सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून नुकताच येथील शहापूर परिसरात म्हसोबा यात्रेनिमित्त एक दिवशीय आरोग्य शिबिर घेण्यात आले.
शहापूर येथील ग्रामदैवत म्हसोबाची यात्रा मंगळवारी उत्साहात संपन्न झाली यावेळी अनेक भाविकांनी मंदिर परिसरामध्ये दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी अतिरिक्त उन्हामुळे होणारा उष्माघातासारखा त्रास होऊ नये म्हणून हॉस्पिटल तर्फे भाविकांना ORS वाटप करण्यात आले. तसेच अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णवाहिकेचेही सोय उपलब्ध करून दिली होती.
अशा प्रकारच्या अत्यावश्यक सेवेचे ( मेडिकल इमर्जन्सी ) पंचक्रोशीतील हे पहिले उदाहरण आहे. त्यामुळे आलेल्या भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. हॉस्पिटल तर्फे डॉ. ऋषिकेश चव्हाण व मुकेश कांबळे ( जनसंपर्क अधिकारी ) यांचे सहकार्य लाभले.दरम्यान मूत्ररोग निदान व या संदर्भातील उपचार यासाठी एस युरोकेअर, टागोर वाचनालयासमोर, विकली मार्केट जवळ इचलकरंजी येथे भेट द्यावी किंवा मोबाईल क्रमांक 8329492057, 7972341166 यावर संपर्क साधण्याचे आवाहन हॉस्पिटल तर्फे केले आहे.