इचलकरंजी महानगरपालिका आरोग्य विभागातील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा उठावाचे काम करणाऱ्या जवळपास ९४ कर्मचाऱ्यांनी याकामी नियुक्त करण्यात आलेल्या मक्तेदार यांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या सुट्टीच्या दिवसाचे वेतन कपात केल्याने मक्तेदार कंपनी विरोधात अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती पुणे विभाग यांचे नेतृत्वाखाली दि. ५ एप्रिल पासून संप सुरू केलेला होता. सदर संपाशी महानगरपालिका प्रशासनाचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याने आणि या संपामुळे स्वच्छतेबाबत संपूर्ण शहर वेठीस धरले गेल्याचे निदर्शनास आलेने तसेच आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी संबंधित मक्तेदार कंपनी आणि संपामध्ये सहभागी होवून शहरास वेठीस धरलेल्या घंटागाडी कर्मचारी यांचेवर कडक कारवाई करणेचे निर्देश दिले होते.
आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे निर्देशाचे अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे , उपायुक्त अशोक कुंभार यांनी या प्रकरणी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य ए.बी.पाटील, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार , सहा. आयुक्त विजय राजापुरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनीलदत्त संगेवार आणि घंटागाडी कर्मचारी प्रतिनिधी यांचे सोबत बैठक झाली.
या बैठकीनंतर घंटागाडी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन उद्या गुरुवार दि.१० एप्रिल पासून कचरा उठावाचे काम पूर्ण क्षमतेने काम सुरू करण्याचे मान्य केले.