Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रचालकाला आली डुलकी, भरधाव कार थेट ट्रकला जाऊन धडकली; समृद्धी महामार्गावरील अपघातात...

चालकाला आली डुलकी, भरधाव कार थेट ट्रकला जाऊन धडकली; समृद्धी महामार्गावरील अपघातात 2 जण ठार, तर तिघे गंभीर

बुलढाणा जिल्ह्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. यात समृद्धी महामार्गावरील मेहकर नजीक नागपूर कॉरिडॉर वरच्या चेनेज 268 जवळ भीषण अपघात झाला आहे.

 

भरधाव कार समोर जात असताना ट्रकला पाठीमागून धडकुन झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.

 

कार पुण्याहून वाशिमकडे जात असताना कार चालकाला झोपेची डुलकी आल्याने अनियंत्रित कार समोर जात असलेल्या ट्रकला धडकून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येतंय.

 

जखमींवर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र तिन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -