Tuesday, April 29, 2025
Homeक्रीडासाई सुदर्शनचा कारनामा, लखनौविरुद्धच्या सामन्यात खास ‘त्रिशतक’ पूर्ण, 18 व्या मोसमात अशी...

साई सुदर्शनचा कारनामा, लखनौविरुद्धच्या सामन्यात खास ‘त्रिशतक’ पूर्ण, 18 व्या मोसमात अशी कामगिरी करणारा पहिलाच

आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात गुजरात टायटन्सच्या फलंदाजांची धमाकेदार कामगिरी सुरु आहे. गुजरातच्या साई सुदर्शन आणि कर्णधार शुबमन गिल या सलामी जोडीने 18 व्या मोसमातील 26 व्या सामन्यात शानदार सुरुवात केली. टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या शुबमन आणि साईने या संधीचा चांगला फायदा घेतला. सलामी जोडीने पावरप्लेमधील 6 ओव्हरमध्ये 54 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी पावरप्लेमध्ये धावा कुटल्या. त्यामुळे गुजरातला 10 ओव्हरमध्ये धावा करता आल्या. या दरम्यान कर्णधार शुबमन गिल याने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

 

शुबमन गिलनंतर साई सुदर्शन याने 11 व्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर चौकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं. साईचं हे या मोसमातील एकूण चौथं अर्धशतक ठरलं. साईने या हंगामातील 6 पैकी 4 सामन्यांत 50 पेक्षा अधिक धावा केल्या. साईचं गेल्या सामन्यात अवघ्या 1 धावेने अर्धशतक हुकलं होतं. साई आतापर्यंत या हंगामात फक्त एकदाच दुहेरी आकडा गाठू शकलेला नाही. यावरुन गुजरातची सलामी फलंदाज काय प्रकारची कामगिरी करत आहेत, याचा अंदाच लावता येऊ शकतो.

 

साई सुदर्शनची मोठी कामगिरी

साई आणि शुबमन या सलामी जोडीने 120 धावांची भागीदारी केली. शुबमन 60 धावा करुन आऊट झाला. शुबमननंतर काही वेळानी साई आऊट झाला. साईने 37 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावांची खेळी केली. साईने या खेळीसह खाक कामगिरी केली. साईने या हंगामात 300 धावा पूर्ण केल्या. साई या मोसमात 300 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. साईच्या नावावर 151.61 च्या स्ट्राईक रेटने एकूण 329 धावा आहेत. साईनंतर मिचेल मार्श हाच एकमेव असा फलंदाज आहे ज्याने 4 अर्धशतकं केली आहेत.

 

आयपीएल 18 व्या मोसमात सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 बॅट्समन

साई सुदर्शन : 329

निकोलस पूरन : 288

मिचेल मार्श : 265

जोस बटलर : 213

शुबमन गिल : 208

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान आणि रवी बिश्नोई.

 

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर आणि मोहम्मद सिराज.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -