Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंग१२ वी नंतर वेळ वाया घालवू नका ! हे कोर्सेस करा आणि...

१२ वी नंतर वेळ वाया घालवू नका ! हे कोर्सेस करा आणि मोठा पॅकेज कमवा

१२वीच्या शेवटच्या पेपरनंतर विद्यार्थ्यांच्या डोक्यात एकच विचार सुरू होतो “आता पुढे काय?” कोणी मेडिकलच्या स्वप्नांसाठी NEETची तयारी करतंय, तर कोणाचं लक्ष्य IIT किंवा NITसाठी JEE आहे. पण हे मार्ग प्रत्येकासाठी सोपे नसतात. काही जण आर्थिक अडचणींमुळे मोठ्या कोर्सेसपासून मागे हटतात, आणि मग सुरू होते सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्सेसची वाटचाल. पण विचार करा, जर हे डिप्लोमा कोर्सेसच तुम्हाला कमीत कमी गुंतवणुकीतून जास्त कमाई करून देतील, तर? चला तर मग, पाहूया असे 5 करिअर मेकिंग कोर्स, जे १२वीनंतर तुमचं आयुष्य बदलू शकतात

 

डिजिटल मार्केटिंग

आजच्या सोशल मीडिया युगात डिजिटल मार्केटिंग हा सर्वात झपाट्याने वाढणारा क्षेत्र आहे. तुम्ही Instagram, YouTube किंवा Google Ads च्या माध्यमातून ब्रँड कसे प्रमोट करायचे, हे शिकलात, की तुम्ही घरबसल्या हजारो रुपये कमवू शकता. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर, तुम्ही नोकरीसाठीही तयार होता आणि फ्रीलान्सिंग सुरू करून स्वतःचा ब्रँडसुद्धा उभारू शकता.

 

डेटा सायन्स

आज जवळपास प्रत्येक कंपनी डेटा वापरून निर्णय घेते. त्यामुळे डेटा सायन्स कोर्सला प्रचंड मागणी आहे. अल्गोरिदम, मशीन लर्निंग, Python यासारख्या टूल्स शिकून तुम्ही या क्षेत्रात डिप्लोमा करू शकता. एकदा या क्षेत्रात पाय रोवला की, लाखोंच्या पगाराची नोकरी तुमच्या उंबऱ्यावर येईल.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)

AI म्हणजे फक्त रोबोट नव्हे – हे भविष्याचं संपूर्ण तंत्रज्ञान आहे. या क्षेत्रात डिप्लोमा घेतल्यानंतर तुम्हाला मशीन लर्निंग, NLP, आणि ऑटोमेशनच्या जगात संधी मिळू शकते. बऱ्याच ऑनलाईन आणि ऑफलाईन संस्थांमधून हा कोर्स करता येतो आणि AI तज्ञांची आज खूप गरज आहे.

 

हार्डवेअर आणि नेटवर्किंग

इंजिनिअरिंगला जाणं शक्य नाही? काही हरकत नाही. हार्डवेअर आणि नेटवर्किंगमधला डिप्लोमा करून तुम्ही IT कंपन्यांमध्ये सहज नोकरी मिळवू शकता. संगणक, नेटवर्क सेटअप, रिपेअरिंग अशा स्किल्सचा वापर करून तुम्ही कमी गुंतवणुकीत चांगलं कमवू शकता.

 

बिझनेस आणि मॅनेजमेंट

जर तुमचं स्वप्न MNC मध्ये काम करण्याचं असेल, तर BBA, PGDM किंवा मार्केटिंग/फायनान्स सारख्या कोर्सेस तुमच्यासाठी उत्तम आहेत. IIM किंवा अन्य नामांकित संस्थांमधून हे कोर्स केल्यास, कॉर्पोरेट जगतात दणक्यात एन्ट्री मिळवता येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -