Monday, April 28, 2025
Homeक्रीडारॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 9 गडी राखून राजस्थान रॉयल्सला नमवलं, गुणतालिकेत झाला असा...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 9 गडी राखून राजस्थान रॉयल्सला नमवलं, गुणतालिकेत झाला असा फायदा

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 28व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्स संघाला 173 धावांवर रोखलं. राजस्थान रॉयल्सने सावध खेळी केली मात्र मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राजस्थान रॉयल्सलने 20 षटकात 4 गडी गमवून 173 धावा केल्या आणि विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं. राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 75 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. विजयासाठी मिळालेलं 174 धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सहज गाठलं. फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली या जोडीने हे आव्हान सोपं केलं. फिलिप सॉल्टने 33 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 65 धावा केल्या. त्याच्या आक्रमक खेळीमुळे धावांमधील अंतर कमी झालं आणि विजय सोपा झाला.विराट कोहलीने 45 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारून नाबाद 62 धावा केल्या. तर देवदत्त पडिक्कलने नाबाद 40 धावांची खेळी केली.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या विजयासह गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. या सामन्याआधी 6 गुण आणि +0.539 नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर होता. मात्र आता राजस्थानला पराभूत करून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. बंगळुरुने 8 गुण आणि नेट रनरेट हा +0.672 झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना मागे टाकलं आहे. राजस्थान रॉयल्सला या पराभवानंतर गुणतालिकेत तसा फटका बसला नाही. राजस्थानचं सातवं स्थान कायम आहे मात्र नेट रनरेट पडला आहे.

 

दोन्ही संघाचे खेळाडू

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.

 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -