Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रSangli Crime : अविवाहित तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन; रात्री...

Sangli Crime : अविवाहित तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन; रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केले अन्..

शिरढोण : बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रथमेश संदीप पाटील (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. काल सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. कवठेमहांकाळ पोलिसांत (Kavathe Mahankal Police) नोंद झाली आहे.

 

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, की प्रथमेश अविवाहित होता. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत (Ratnagiri-Nagpur National Highway) असलेल्या पेट्रोल पंपाजवळ बोरगावपासून अर्ध्या किलोमीटरवर त्याचं घर आहे. या ठिकाणी तो कुटुंबासह राहत होता. त्याचे शिक्षण चांगल्या प्रकारे झाले असून तो कुपवाड येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होता.

 

रविवारी (ता. १३) कुटुंबीयांसमवेत जेवण करून रात्री अकराच्या दरम्यान घरातून बाहेर पडला. परत तो आलाच नाही. दरम्यान, रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ आंब्याच्या झाडाला प्रथमेशने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. कवठेमहांकाळ पोलिसांत नोंद झाली असून निरीक्षक जोतिराम पाटील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -