मुंबई इंडियन्सकडून काल सनरायजर्स हैदराबादचा पराभव झाला. IPL 2025 मध्ये सनरायजर्स हैदराबादचा हा पाचवा पराभव आहे. आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात SRH चा हा पाचवा पराभव आहे. पण प्लेऑफमध्ये पोहोचण्याची SRH कडे अजूनही संधी आहे. 5 मॅच हरल्यानंतरही आयपीएलमध्ये ऑरेंज आर्मीच्या नावाने प्रसिद्ध असलेली हैदराबादची टीम प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. शेवटचा चेंडू पडत नाही, तो पर्यंत गेम ओव्हर समजू नका, असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. सनरायजर्स हैदराबादच सुद्धा असच आहे. IPL 2025 मध्ये SRH ने सातपैकी पाच सामने गमावले आहेत. पण सात सामने अजून बाकी आहेत. त्यामुळे हैदराबादची टीम अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा जिवंत आहे.
IPL 2025 च्या ग्रुप स्टेजमध्ये सर्वच टीम्स प्रत्येकी 14 सामने खेळणार आहे. यात सर्वच टीम्सचे 7 सामने जवळपास पूर्ण झाले आहेत. 7 पैकी 5 सामने गमावल्यामुळे सनरायजर्स हैदराबादची टीम पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून दुसरी म्हणजे 9 व्या स्थानावर आहे. पण अजूनही त्यांचा प्लेऑफ म्हणजे टॉप 4 मध्ये पोहोचण्याचा मार्ग खुला आहे. ते कसे पोहोचू शकतात ते समीकरण समजून घ्या.
इतके पॉइंट म्हणजे प्लेऑफचा तिकीट पक्क करण्याचं पहिलं पाऊल
टॉप फोरमध्ये जाण्यासाठी सनराजयर्स हैदराबादला उर्वरित सर्वच्या सर्व 7 सामने जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण असं झालं नाही, तर कमीत कमी 7 पैकी 6 सामने जिंकावे लागतील. सध्या 7 पैकी 2 सामने जिंकून त्यांचे 4 पॉइंट आहेत. पुढच्या सात पैकी 6 सामने जिंकल्यास त्यांचे 12 पॉइंट होतील. एकूण मिळून त्यांचे 16 पॉइंट होतील. ग्रुप स्टेजमध्ये 16 पॉइंट हे प्लेऑफच तिकीट पक्क करण्याचं पहिल पाऊल आहे.
आव्हान कठीण पण अशक्य नाही
सनरायजर्स हैदराबादला उर्वरित 7 सामन्यांपैकी 3 मॅच आपल्या होमग्राऊंडवर हैदराबादला खेळायच्या आहेत. घरच्या मैदानावर मॅच आहे, तर भिती कसली असं तुम्ही म्हणू शकता. पण 7 पैकी 4 सामने त्यांच्या घरच्या मैदानावर झाले, तिथे ते दोन जिंकले, दोन हरले. म्हणजे 50-50 चा विषय आहे. उर्वरित 7 पैकी 3 सामने हैदराबाद येथे तर चार सामने चेन्नई, अहमदाबाद, लखनऊ आणि बंगळुरु येथे होणार आहेत. आव्हान कठीण आहे, पण दोनवेळ चॅम्पियन बनलेल्या सनरायजर्ससाठी हे अशक्य सुद्धा नाही.
मुंबई इंडियन्सला अजून किती सामने जिंकावे लागतील?
मुंबई इंडियन्सलाही प्लेऑफमध्ये पोहोचण शक्य आहे. 16 पॉइंट्स प्लेऑफचा पहिला टप्पा मानला जात असेल, तर सध्या मुंबईचे 6 पॉइंट्स आहेत, म्हणजे अजून 10 पॉइंट्सची आवश्यकता आहे. 7 पैकी निदान पाच सामने मुंबई इंडियन्सला जिंकावेच लागतील. सध्या चार पराभव आणि तीन विजयांसह मुंबई इंडियन्सचे सहा पॉइंट्स आहेत. 7 व्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सचा रनरेटही प्लसमध्ये आहे.