येथील आसरानगर परिसरात रात्री अंगणात झोपलेल्या सुरज गोरवे (वय ३१) याच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला. त्याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान भटक्या कुत्र्याने केलेल्या परिसरामधील हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. येथील आसरानगर परिसरात अंगणात झोपलेल्या सुरज गोरखे याच्यावर कुत्र्याने अचानक हल्ला केला. सुरजने आरडाओरडा केल्याने नागरीक जमले आणि त्याला कुत्र्याच्या तावडीतून वाचवले. मात्र, या हल्ल्यात सुरजच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -