इचलकरंजी : राज्यात चोरट्यांनी(Thieves) धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता इचलकरंजीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने(Thieves) हिसका मारून लंपास केले आहे. सोलगे मळा परिसरात ही घटना घडली आहे. याबाबत गावभाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी वृषाली शशीकांत जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
सोलगे मळा परिसरातील एकता कॉलनीतील वृषाली शशीकांत जाधव या दुचाकी मोपेडवरून मुलीला क्लासला सोडून घरी परतत होत्या. स्वयंभू शिवमंदिरजवळ त्या आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गाडीच्या आडवी गाडी मारत पत्ता विचारला. त्याचवेळी त्यांनी वृषाली यांच्या गळ्यातील १० ग्रॅमचे मंगळसूत्र हिसका मारून चोरुन नेले.
मंगळसुत्रातील अर्धाभाग चोरट्यांच्या हाती लागला नाही. जाधव यांनी आरडाओरडा करताच दुचाकीवरील दोघे नारायण मळा परिसराकडे पसार झाले. याबाबत जाधव यांनी गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा शोध घेण्याचे सुरु आहे.