तीन वर्षाच्या मुलाला जळगाव येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.उपचारानंतर मुलगा शुद्धीत न आल्यामुळे त्याला दोन खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र वीस रोजी सायंकाळी त्याला मृत घोषित करण्यात आले. मुलाच्या ट्रीटमेंटसाठी व्याजाने पैसे घेतलेले होते. आज जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. पालकांनी पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसल्याचा आरोप केलेला आहे. रुग्णालयाने दिलेल्या नोट वरून अकस्मात मृत्यूची नोंद जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे.
भुसावळ तालुक्यातील खडक येथे राहणारे अमोल धाडे व मनिषा धाडे यांचा तीन वर्षाचा हर्षल नावाचा मुलगा होता. त्याला जळगाव येथील रुग्णालयात उपचार करण्यासाठी चार दिवसांपूर्वी भरती करण्यात आले होते. इंजेक्शन देऊन त्याला प्लास्टर लावण्यात आले होते. त्यावेळेस त्याला भूलही देण्यात आली होती असे पालकांचे म्हणणे आहे, मात्र इंजेक्शन व पायाला प्लास्टर लावल्यानंतर तीन वर्षाचा मुलगा शुद्धीत न आल्याने त्याला आर एल च्या दवाखान्यात हलवण्यात आले.
तेथून मेंदूचे कारण सांगून दाबी रुग्णालयात घालवण्यात आले. मात्र 20 रोजी सायंकाळी त्याला मृत घोषित करून पोलीस स्टेशनला खबर देऊन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मुलाचे 21 रोजी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
यावेळी माध्यमांशी बोलताना पालकांनी सांगितले की, आम्ही व्याजाने पैसे घेऊन मुलाच्या ट्रीटमेंटसाठी येथे आणले होते. डॉक्टरांनी या ट्रीटमेंटची जबाबदारी घेतली होती, मात्र उपचार केल्यानंतर मुलाची तब्येत खराब झाली व त्याला तेथून व्हेंटिलेटर नसल्याचे सांगून दुसऱ्या रुग्णालयात नेले. तेथूनही त्याचं मेंदूचे कारण सांगून दुसऱ्या डॉक्टरांकडे नेले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्याकडे गेले. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर रात्रीचे कारण सांगून व अधिकारी नसल्याचे कारण सांगून तक्रार नोंदउन घेतली नाही.