Wednesday, July 30, 2025
Homeक्रीडाचेन्नईनंतर आता या टीमला झटका, कर्णधाराला दुखापत;पुन्हा कॅप्टन बदलणार!

चेन्नईनंतर आता या टीमला झटका, कर्णधाराला दुखापत;पुन्हा कॅप्टन बदलणार!

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे आयपीएल 2025 मधून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला 18 व्या मोसमादरम्यान कर्णधार बदलावा लागला. ऋतुराजच्या नेतृत्वात आता महेंद्रसिंह धोनी सीएसकेचं नेतृत्व करत आहे. त्यानंतर आता आणखी एका संघाला मोठा झटका लागला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याला दुखापत झाली आहे. त्यामुळे संजू समॅसन याला आगामी सामन्यात खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे राजस्थानचा कर्णधार बदलणार, हे निश्चित झालं आहे.

 

राजस्थान रॉयल्स या मोसमातील आपला पुढील सामना हा 24 एप्रिलला खेळणार आहे. राजस्थानसमोर या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान असणार आहे. राजस्थानची संजू सॅमसनशिवाय खेळण्याची दुसरी वेळ ठरेल. राजस्थान याआधी 19 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध संजूशिवाय खेळली होती. तेव्हा संजूच्या अनुपस्थितीत युवा रियान पराग याने नेतृत्व केलं होतं. त्यामुळे आता आरसीबीविरुद्धही संजूंच्या अनुपस्थितीत रियानलाच नेतृ्त्व करावं लागणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.

 

संजू सॅमसन याला दिल्ली कॅपिट्ल्स विरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. तेव्हा संजूला दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन बॅटिंग अर्धवट सोडून मैदानाबाहेर जावं लागलं होतं. दिल्लीने राजस्थानवर या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता.

 

ओपनिंग कोण करणार?

दरम्यान संजू सॅमसन राजस्थानसाठी ओपनिंग करतो. मात्र आता संजूच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वाल याच्यासोबत ओपनिंगला कोण येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संजूने या हंगामात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 37 चेंडूत 66 धावांची खेळी केली होती. तसेच संजूने दिल्लीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 19 बॉलमध्ये 31 रन्स केल्या. त्यानंतर संजू रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. तर संजूला सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी येता आलं नाही. त्यामुळे आता संजू्ऐवजी 14 वर्षीय युवा वैभव सूर्यवंशी ओपनिंगला येऊ शकतो.

 

संजू आरसीबीविरुद्धच्या सामन्यातून आऊट

राजस्थान रॉयल्स टीम : यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, संजू सॅमसन, कुणाल सिंग राठौर, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, युधवीर सिंग चरक, अशोक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -