Tuesday, July 29, 2025
Homeइचलकरंजीहत्यार घेऊन दहशत माजवणान्या दोघांना अटक

हत्यार घेऊन दहशत माजवणान्या दोघांना अटक

बंदी आदेशाचा भंग करत दहशत माजवण्याच्या उद्देशाने प्राणघातक हत्यारे बाळगल्याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने दोघांना अटक केली आहे. गंगा प्रविण पाटील (वय १९ रा. बेघर वसाहत यड्राव) व विनायक अनिल

मिठारे (वय २३ रा. संगमनगर तारदाळ) अशी त्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून तलवार,कोयता, गुप्ती आणि हिरोहोंडा मोटरसायकल असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी यांनी बंदी आदेश जारी केलेले आहे. पण हा बंदी आदेश झुगारून संगमनगर परिसरात दोघेजण हातात तलवार, कोयता व गुप्ती अशी शस्त्रास्त्रे घेऊन परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने संगमनगर भागात फिरत असल्याची माहिती शहापूर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला गस्ती दरम्यान समजली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जावून कारवाई करत गंगा पाटील व विनायक मिठारे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तलवार, कोयता व गुप्ती अशी शस्त्रे मिळून आल्याने त्यांना अटक करत शस्त्रास्त्रासह दुचाकी (एमएच ०९ डीटी ३९९८) जम करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरिक्षक सचिन सुर्यवंशी, सपोनि प्रशांत निशाणदार यांच्या मार्गदर्शखाली गुन्हे शोध पथकातील अविनाश मुंगसे, असिफ कलयगार, रोहित डावाळे, आयुब गडकरी, शशिकांत ढोणे, गजानन कोष्टी, पोपट भंडारे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -