Sunday, July 6, 2025
Homeक्रीडागुजरात टायटन्सचा धमाकेदार विजय, कोलकाता नाईट रायडर्सचा घरच्या मैदानात 39 धावांनी धुव्वा

गुजरात टायटन्सचा धमाकेदार विजय, कोलकाता नाईट रायडर्सचा घरच्या मैदानात 39 धावांनी धुव्वा

गुजरात टायटन्सने शुबमन गिल याच्या नेतृत्वात आयपीएल 2025 मध्ये सोमवारी 21 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सचा त्यांच्याच घराच्या मैदानात अर्थात ईडन गार्डन्समध्ये 39 धावांनी धुव्वा उडवला आहे. गुजरातने केकेआरसमोर विजयासाठी 199 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र केकेआरचे फलंदाज गुजरातच्या गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरले. केकेआरला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 159 धावाच करता आल्या. गुजरातने यासह केकेआरवर एकतर्फी विजय साकारला. गुजरातने यासह आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सहावा विजय मिळवला आहे. गुजरात यासह 6 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली आहे.

 

केकेआरची बॅटिंग

केकेआरचा रहमानुल्लाह गुरुबाज 1 धाव करुन आऊट झाला. त्यानंतर सुनील नारायण याने 17 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. केकेआरने पावरप्लेमध्ये दुसरी विकेट गमावली. त्यामुळे मैदानात आलेल्या वेंकटेश अय्यरकडून अजिंक्य रहाणेला चांगली साथ मिळेल, अशी आशा होती. मात्र वेंकटेशने 14 धावा करुन मैदान सोडलं. केकेआरने अशाप्रकारे 3 विकेट्स गमावल्या.

 

मात्र कर्णधार अजिंक्य रहाणे एक बाजू लावून होता. मात्र रहाणेदेखील वेंकटेशनंतर आऊट झाला. केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणे याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. रहाणेने 36 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 फोरसह 50 धावा केल्या. रहाणेचं हे या मोसमातील एकूण तिसरं अर्धशतक ठरलं. मात्र रहाणे व्यतिरिक्त एकाही फलंदाजाने केकेआरला जिंकवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. केकेआरची बॅटिंग पाहता ते मैदानात उतरलेच नाहीत, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

 

रहाणेनंतर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह या जोडीकडून केकेआरला आशा होती. मात्र ही जोडीही काही फटके मारुन तंबूत परतली. रसेलने 15 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 21 रन्स केल्या. तर रिंकूने 14 बॉलमध्ये 1 फोर आणि 1 सिक्ससह 17 रन्स केल्या. त्यानंतर फक्त केकेआरच्या पराभवाची औपचारिकताच बाकी होती.

 

गुजरातचा सहावा विजय

रमनदीप सिंह 1 धाव करुन मैदानाबाहेर गेला. मोईन अली याला तर भोपळाही फोडता आला नाही. तर युवा अंगकृष रघुवंशी याने 13 चेंडूत नाबाद 27 धावांची खेळी केली आणि पराभवातील अंतर कमी करण्यात योगदान दिलं. गुजरातकडून एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. प्रसिध कृष्णा आणि राशिद खान या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि आर साई किशोर या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -