बिहार राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्याच सहा वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. तिने आपल्याच मुलाला अॅसिड(acid) पाजून जीव घेतला आहे. अनैतिक संबंधास अडथळा ठरत होता म्हणून या महिलेने हत्या केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण बिहार हादरले असून महिलेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मुलाच्या हत्येचा आरोप असलेल्या महिलेला ताब्यात घेतलं असून तिची सखोल चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मोसादपूर गावातील आहे. येथे ललन कुंवर नावाच्या व्यक्तीचा सहा महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर ललन यांची पत्नी आणि मुलगा काम करून चरितार्थ भागवायचे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर ही महिला आपल्या मुलासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुसैना या गावी स्थायिक झाली. याच ठिकाणी या महिलेचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी भेटायचे.
आरोपी महिलेचा सहा वर्षाचा मुलगा महिलेच्या प्रेमसंबंधात वेळोवेळी अडथळा ठरायचा. प्रेमसंबंधातील अडथळ्यामुळे या महिलेला तिच्या मुलाची अडचण होऊ लागल्याने महिलेने आपल्या पोटच्या मुलाला संपवण्याचा कट रचला. त्यानंतर प्रियकराच्या सल्ल्यानुसार या महिलेने आपल्याच सहा महिन्यांच्या मुलाला अॅसिड(acid) पाजून त्याची हत्या केली.