काश्मीरमधील पहालगाम येथे मंगळवारी दुपारी दहशतावाद्यांनी केलेल्या 26 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमवला. त्यामध्ये भारतीयांसह परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधसाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे. NIA ची टीम श्रीनगमरध्ये पोहोचली आहे. या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन अतिरेक्यांचे स्केच सुरक्षा यंत्रणांकडून जारी करण्यात आलं आहे.
पहलगाममध्ये अडकले कोल्हापूर आणि नागपूरकर
मंगळवारी दुपारी झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचाही समावेश आहे. दरम्यान हा हल्ला झाला तेव्हा महाराष्ट्रातील काही पर्यटक तेथेच फिरण्यासाठी गेले होते, मात्र सुदैवाने तेथून ते बचावले. दैव बलवत्तर म्हणून पहेलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातून कोल्हापुरातील पर्यटक बचावले. कोल्हापुरातील अनिल कुरणे व सहकारी हे काश्मीरला फिरायला गेले होते, हल्ला झाला तेव्हा ते आसपासच्या परिसरातच होते.
मात्र वेळेत घोडे न मिळाल्याने अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पहेलगाम पर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला. ते पहलगाम पासून दीड किलोमीटर मागे असतानाच दहशतवादी हल्ला सुरू झाला. त्यांच्या ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने हल्ल्याची माहिती देताच अनिल कुरणे व त्यांचे सहकारी माघारी फिरले. सध्या अनिल कुरणे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी जम्मू काश्मीर मध्ये सुखरूप असून घरी परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
नागपूरचे रहिवासीही काश्मीरमध्ये अडकले
तर नागपूरातील कोराडी येथील पृथ्वीराज वाघमारे, त्यांची पत्नी मणिषा वाघमारे आणि मुलं सध्या कश्मीरमध्ये असून तेही पहलगामच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचले. काल हल्ला झाला त्याच्या थोडा वेळ आधीच ते पहलगाम येथून निघाले, त्यामुळे वाचले. सध्या वाघमारे परिवार श्रीनगरमध्ये असून ते सुरक्षित आहेत.
वाघमारे परिवार सध्या साई रिसॉर्ट श्रीनगर येथे थांबले आहे. मात्र या हल्ल्यानंतर त्यांचा नागपूरातील परिवार चिंतेत आहेत. उद्या दुपारी ते श्रीनगरवरुन नागपुरात परत येणार आहेत. वाघमारे परिवारीतल सात लोक श्रीनगरमध्ये अडकले आहेत. त्यांच्याशी नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवरुन संपर्क साधला. श्रीनगर येथे अडकलेल्या सातंही सदस्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे मदतीचं आश्वासन देण्यात आलं.