Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रकाश्मीरला फिरायला जातोय, लवकर येईन! संतोष जगदाळे आईला शेवटचं भेटले; मृतदेह पाहून...

काश्मीरला फिरायला जातोय, लवकर येईन! संतोष जगदाळे आईला शेवटचं भेटले; मृतदेह पाहून पत्नी धाय मोकलून रडली

काश्मीरच्या पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. त्यापैकी पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे (kaustubh ganbote) यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुण्यात आणण्यात आले. पहाटेच्या सुमारास जगदाळे (Santosh Jagdale) आणि गणबोटे यांचे मृतदेह पुणे विमानतळावर आणण्यात आले. यानंतर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. (Kashmir Attack News)

 

संतोष जगदाळे हे त्यांच्या 86 वर्षांच्या वृ्द्ध आईला काश्मीरला जाण्यापूर्वी भेटले होते. काश्मीरला फिरायला जातोय, लवकर येईन, असे त्यांनी आईला सांगितले होते. मात्र, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केल्याने जगदाळे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. संतोष जगदाळे यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आला तेव्हा त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. संतोष जगदाळे यांची पत्नी धाय मोकलून रडत होती.

 

कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्यांना अश्रू अनावर झाले आहेत. कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांचा फसरणाचा व्यवसाय होता. त्यामुळे हे कुटुंब या परिसरात प्रसिद्ध आहे. पुणे एअरपोर्टवर गुरुवारी पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहचल्या होत्या.. मंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित. दोन्ही कुटुंबांचे नातेवाईक एअरपोर्टवर आले होते. गणबोटे यांच्या पत्नी , मुलगा आणि इतर नातेवाईक दुसऱ्या विमानाने पुणे एअरपोर्टला पोहचले आहेत. यानंतर ते आपल्या निवासस्थानी गेले. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून मित्र होते. त्यामुळे हे दोन्ही कुटुंबीय एकत्रच काश्मीर फिरायला गेले होते. मात्र, या दोन्ही कुटुंबातील पुरुषांना दहशतवादी हल्ल्यात जीव गमावावा लागला.

 

महाराष्ट्रातील मृतांची नावे-

 

1) अतुल मोने – डोंबिवली

2) संजय लेले – डोंबिवली

3) हेमंत जोशी- डोंबिवली

4) संतोष जगदाळे- पुणे

5) कौस्तुभ गणबोटे- पुणे

6) दिलीप देसले- पनवेल

 

जखमींची नावे-

 

1) एस बालचंद्रू

2) सुबोध पाटील

3) शोबीत पटेल

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -