शेअर बाजारात अनेक जण गुंतवणूक करत असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात कमालीचे अनिश्चित वातावरण आहे. या काळात काही शेअरकडून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. काही पेनी स्टॉकने चांगले रिटर्न दिले आहे. सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टमच्या शेअरने गेल्या चार वर्षांत भरभरून परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. 4 वर्षांत 4,900 % रिटर्न या शेअरने दिले आहे.
सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम मल्टीबॅगर पेनी शेअरमध्ये 28 एप्रिल रोजी चांगली मागणी दिसली. संपूर्ण एप्रिल महिन्यातील या शेअरची कामगिरी जोरदार राहिली. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम ही ड्रीम लीक ऑफ इंडियाची सहायक कंपनी आहे. त्यानंतर सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टमच्या शेअरची मागणी वाढली आहे.
सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टमने एक फायलिंग म्हटले की, ड्रीम लीग ऑफ इंडिया (T10) प्रायव्हेट लिमिटेड ही सर्वोटेक स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून समाविष्ट केली आहे. जी सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम्सची उपकंपनी आहे. कंपनीला अनेक नवीन प्रोजेक्ट मिळाले आहे.
सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टमच्या शेअरमध्ये सोमवार 28 एप्रिल रोजी चांगलीच वाढ झाली. ट्रेडिंग सेशन दरम्यान हा पेनी स्टॉक 5.61% वाढून ₹131 वर बंद झाला. मागील चार वर्षांत या शेअरने चांगली कामगिरी केली आहे. 2 सप्टेंबर 2021 रोजी हा शेअर केवळ ₹2.58 वर कारभार करत होता. आज जवळपास 130 रुपयांवर हा शेअर पोहचला आहे. त्याची ही वाढ चार वर्षांत 4,977 % आहे. सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टमचा शेअर 52 आठवड्यात 205.40 वर पोहचला होता. तसेच वर्षभरात तो 75.50 पर्यंत खाली आला होता.
23 सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम कंपनीने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथील ईस्ट कोस्ट रेल्वेचा प्रकल्प मिळाल्याचे जाहीर केले. 4.1 मेगावॅटचा ऑन-ग्रिड रूफटॉप सोलर हा प्रकल्प आहे. त्याची किंमत 15.8 कोटी रुपये आहे. कंपनीची 6 मे 2025 रोजी बैठक होणार आहे. त्यात कंपनीची वर्षाभराची कामगिरी मांडली जाईल.