भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे .मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकताच लग्न मंडपातच वडिलांचा हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झालाय .तुमसर तालुक्यातील झारली गावात आज (29 एप्रिल) दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय . लग्न सोहळ्यादरम्यानच हार्ट अटॅक आल्याने क्षणार्धात मुलीचे वडील स्टेजवरच कोसळले .यातच त्यांचा मृत्यू झाला .या घटनेमुळे सारा गाव हळहळला आहे . गणेश खरवडे (54) असे मृत वधूपित्याचे नाव आहे .
नक्की घडले काय?
मुलीच्या लग्नातच पित्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अमृत वडील गणेश वरखडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे एक एकर शेती आहे .मुलीच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून पैसे घेऊन त्यांनी पल्लवीचा विवाह थाटामाटात केला .दुपारी कन्यादान केल्यानंतर पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली .त्यावेळी स्टेजवरच वधूच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते विवाह मंडपातच कोसळले .क्षणार्धात त्यांचा मृत्यू झाला . वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे वधूची पाठवणी करणं थांबवलंय .वडिलांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिवारासह गावावर शोककळा पसरली आहे .
वडील अल्पभूधारक शेतकरी, मुलीचं कन्यादान करताच..
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील झारली गावात गणेश खरवडे यांच्या अचानक मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गणेश खरवडे असं वधूपित्याचे नाव असून ते अल्पभूधारक शेतकरी होते. झारली गावात त्यांची एक एकर शेती आहे. लेकीच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून पैशांची जमवाजमव करत त्यांनी थाटामाटात लग्न लावून दिलं. कन्यादान झालं. लेकीच्या डोक्यावर अक्षता पडल्याचं सुख अनुभवलं. स्टेजवर फोटो काढण्यासाठी वर्दळ वाढली. तेवढ्यात अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने ते पाहता पाहता लग्नमंडपात कोसळले. उपस्थित नातेवाईकांनी, कुटुंबीय त्यांच्या दिशेने धावले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.