अदानी पोर्ट्स अॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने ( APSEZ ) 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्षे २०२५ मध्ये ११,००० कोटींहून अधिकचा निव्वळ नफा ( PAT ) आणि ४५० एमएमटी माल हातळणी यासह हे यश एकात्मिक विचार आणि अचूक अंमलबजावणीचे फलित आहे, असे APSEZ चे संचालक आणि सीईओ अश्विनी गुप्ता यांनी म्हटले आहे.
“आम्ही सर्व मापदंडांवर मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा चांगली कामगिरी केली, भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आमचा ठसा वाढला आहे आणि लॉजिस्टिक्स आणि मरीन व्यवसाय भविष्यातील वाढीचे इंजिन ठरले आहे. मुंद्रा बंदराचे २०० MMT पार करणे, व्हीजिनजमचा जलद 1 लाख TEUs गाठणे, तसेच NQXT आणि अॅस्ट्रो ऑफशोअरचे धोरणात्मक अधिग्रहण—ही कामगिरी आमच्या जागतिक स्तरावरील लॉजिस्टीक्स प्लॅटफॉर्म बनण्याच्या दृष्टिकोनाची साक्ष देते. मजबूत आर्थिक पाया, ESG मधील आघाडीचे स्थान आणि सर्वोत्कृष्टतेबाबतची आग्रहामुळे FY26 मध्येही अधिक प्रगती होईल असे सीईओ अश्विनी गुप्ता यांनी सांगितले.
धोरणात्मक ठळक बाबी
डोमेस्टीक विस्तार: गोपाळपूर बंदराचे अधिग्रहण पूर्ण. भारतातील पहिले पूर्णपणे स्वयंचलीत ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून विजिनजमने काम सुरू केले आणि एका महिन्यात 1 लाख TEUs पार केले. कोलकात्यातील श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्टमध्ये संचालन सुरू; दींडायल पोर्ट प्राधिकरणाकडून बर्थ क्र.13 विकसित करण्यासाठी करार.
आंतरराष्ट्रीय विस्तार: कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनलमध्ये कामकाज सुरु आहे. श्रीलंकेत पहिले पूर्णपणे स्वयंचलित खोल बंदर टर्मिनल सुरु केले. ऑस्ट्रेलियातील नॉर्थ क्विन्सलँड एक्सपोर्ट टर्मिनलचे ( NQXT ) अधिग्रहण मंजूर करण्यात आले आहे. टांझानियातील दार-ए-सलाम पोर्टवरील कंटेनर टर्मिनलच्या व्यवस्थापनासाठी 30 वर्षांचा करार केला आहे.
हायफा पोर्ट: व्यवस्थापन प्रक्रिया सुसंगत करणे सुरू; संघटना करारावर स्वाक्षरी. FY25 मध्ये हायफा पोर्टचे EBITDA 36% ने वाढले आहे.
मरीन व्यवसाय: अॅस्ट्रो ऑफशोअरचे अधिग्रहण पूर्ण. एकूण मरीन फ्लीट 115 जहाजांपर्यंत वाढली. हा व्यवसाय पुढील दोन वर्षांत 3 पट वाढवण्याचा उद्दिष्ट आहे
लॉजिस्टिक्स व्यवसायात 39% टक्के महसूल वाढ. नव्या सेवा—Truck Management Solution ( TMS ) आणि International Freight Network सुरू केले आहे.
ठळक बाबी
एकूण माल हाताळणी : 450 MMT (+7% YoY); कंटेनर +20%, द्रव आणि गॅस +9%
अखिल भारतीय मार्केट शेअर : 27% (FY24 मध्ये 26.5%)
कंटेनर मार्केट शेअर : 45.5% (FY24 मध्ये अंदाजे 44%)