मुंबईचा राजा रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएल २०२५ च्या निर्णायक टप्प्यात फॉर्मात आलाय…. मागच्या ५ सामन्यात त्याने २३४ धावा ठोकल्या आहेत. कालच्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात सुद्धा त्याने ३६ चेंडूत ५३ धावा केल्या आणि मुंबईला मजबूत सलामी दिली…१४७.२२ च्या स्ट्राईक रेटने रोहित शर्मा हा राजस्थानच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. या धावा करताना रोहितने आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला आहे.. रोहित शर्मा आता टी-२० क्रिकेटमध्ये एकाच फ्रँचायझीसाठी ६००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा दुसरा क्रिकेटपटू बनला आहे.. रोहितच्या आधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे…
मुंबईसाठी रोहितच्या २३१ सामन्यांमध्ये ६०२४ धावा- Rohit Sharma
रोहित शर्मा २०११ पासून मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळतोय .. आत्तापर्यत त्याने मुंबईसाठी २३१ सामन्यांमध्ये ६०२४ धावा केल्या आहेत… तर दुसरीकडे विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी २७७ सामन्यांमध्ये ८८७१ धावा केल्या आहेत. रोहित काही वर्षांपूर्वी मुंबईसाठी मधल्या फळीत फलंदाजी करायचा, त्यानंतर तो सलामीला येऊ लागला… आक्रमक फलंदाजीमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) हा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचंगा कणा बनलाय… जेव्हापासून रोहित फॉर्मात आलाय तेव्हापासून मुंबईने एकही सामना गमावलेला नाही यावरूनच संघातील त्याच महत्व आणि भूमिका स्पष्ट होते….
T20 क्रिकेटमध्ये एकाच फ्रँचायझीसाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –
१) विराट कोहली – २७७ सामन्यांमध्ये ८८७१ धावा
) रोहित शर्मा – २३१ सामन्यांमध्ये ६०२४ धावा
३) सुरेश रैना – २०० सामन्यात ५५२९ धावा
४) महेंद्रसिंग धोनी – २६८ सामन्यांमध्ये ५२६९ धावा
मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर
दरम्यान, मागच्या आठवड्यात पॉईंट टेबल मध्ये ८ व्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सने सर्वाना आश्चर्यचकित करत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबईने मागच्या ६ सामन्यात सलग ६ विजय मिळवले आहेत… रोहित शर्मा फॉर्म परतणे आणि जसप्रीत बुमराहची वापसी यामुळे मुंबईचा संघ अतिशय मजबूत आणि ताकदवान झालाय… सलामीवीर विकेटकिपर रायन रिकल्टन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या हे सुद्धा चांगलेच फॉर्मात आहेत… ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि कर्ण शर्मा हे गोलंदाजही टिच्चून बॉलिंग करताना दिसतायत…. एकूणच काय तर मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या लयीत आलाय… आयपीएल २०२५ जिंकण्याच्या दिशेने पलटणची वाटचाल चाललीय…