Friday, May 9, 2025
Homeइचलकरंजीबनावट नोटा प्रकरणी चौघांवर गुन्हा दोघांना सात दिवसाची कोठडी

बनावट नोटा प्रकरणी चौघांवर गुन्हा दोघांना सात दिवसाची कोठडी

दोनशे रूपयांच्या बनावट नोटा पानटपरीत खपविणाऱ्या दोघांना शहापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी एकूण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद रामचंद्र पोवार, अवधुत प्रकाश पोवार (दोघे रा. सुतार मळा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पंकज संभाजी पोवार (वय ३०, रा. विनायक हायस्कल समोर शहापूर) यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी कि, फिर्यादी पंकज पोवार याची विनायक हायस्कूल शेजारी पानटपरी आहे. सदर पान टपरीत फिर्यादीचे वडील

इचलकरंजी बनावट नोटा खपविणाऱ्या दोघांना न्यायालयात नेताना शहापूर पोलिस. (छाया मयूर फोटो)

असतात. १ ते ३ मे २०२५ च्या दरम्यान प्रमोद पोवार आणि अवधुत पोवार या दोघांनी २० रूपयांची सिगारेट खरेदी करून त्यापोटी दोनशे रूपयांची बनावट नोट दिली आणि १८० रुपये परत घेऊन गेले. त्यानंतर पुन्हा येऊन सिगारेट खरेदी केली तसेच २०० रुपये देऊ केले. तेव्हा पानटपरी चालकास नोटेबाबत शंका आली. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार सिगारेट खरेदी

करून नकली नोट देणाऱ्या प्रमोद पोवार आणि अवधुत पोवार या दोघांना अटक केली, त्यांनी अर्जुन दळवी (रा. विकली मार्केट) आणि ओकार साळुंखे (रा. इचलकरंजी) यांच्या सांगण्यावरून वीस टक्के कमिशनकरीता बनावट नोटा चलनात आणल्याचे सांगितले. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रमोद पोवार, अवधुत पोवार यांना अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -