Friday, July 25, 2025
Homeइचलकरंजीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जयसिंगपूरमध्ये

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जयसिंगपूरमध्ये

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी ५ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता मजले हेलीपॅड येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर ते मोटारीने जयसिंगपूर (ता. शिरोळ) कडे प्रयाण करतील. सायंकाळी ६ वाजता जयसिंगपूर येथील सांगली कोल्हापूर रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा व म्युझियमच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती लावतील. सायंकाळी ७ वाजता ते मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण करतील व रात्री ८ वाजता कोल्हापूर विमानतळ येथून ते विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -