सोने आणि चांदीने गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना घाम फोडला आहे. सोन्याने चांदीसारखाचा लाखांचा टप्पा ओलांडल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. सोने आणि चांदीच्या दरात चढउतार दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून एक लाखांच्या टप्प्यात असलेल्या सोन्यात घसरण दिसून आली. तर आता सोन्याने महागाईचा सूर आळवला. चांदीत पडझड झाली. सराफा बाजारात आता काय आहेत किंमती?
देशातील प्रमुख चार शहरातील भाव
मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 87,750 रुपये, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 95,730 रुपये, तर दिल्ली येथील सोन्याचा दर 87,900 रुपये तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 95,880 रुपये आहे. दुसरीकडे कोलकत्ता येथे सोन्याचा भाव 87,750 रुपये तर 24 कॅरेट सोने 95,730 रुपये भाव, चेन्नईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 87,750 रुपये तर 24 कॅरेट सोने 95,730 रुपये असा आहे.
सोमवारी सोने वधारले
सोमवारी बाजार उघडताच शनिवारच्या तुलनेत जळगाव सराफा बाजारात सोने 206 रुपयांनी वधारले. तर दुपारनंतर सोने दराने 1648 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सुवर्णपेठेत एकाच दिवशी 1854 रुपयांची वाढ दिसून आली. 10 ग्रॅम सोन्यासाठी 98 हजार रुपये मोजावे लागले.
अमेरिकेमधील व्यापार धोरणाची अनिश्चितता, जगातील भूराजकीय घडामोडी, भारत-पाकिस्तानमधील ताणतणाव यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ग्राहक सोने खरेदीकडे वळले आहेत. डॉलरची घसरण सुरू असल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून जगातील मध्यवर्ती बँका या मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहे. सोन्याच्या किंमती आणखी वाढणार आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोने 38-43 टक्क्यांपर्यंत घसरेल?
Morningstar चे मार्केट स्ट्रॅटजिस्ट जॉन मिल्सच्या अंदाजानुसार, सोने 1820 डॉलर प्रति औंसपर्यंत घसरण होऊ शकते. सध्याच्या 3,198 डॉलर प्रति औंसपासून जवळपास 43 टक्क्यांची घसरण येऊ शकते. भारतात सोन्याचा भाव सध्या 95,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. यामध्ये जर 43 टक्क्यांपर्यंतची घसरण गृहीत धरली तर सोन्याचा भाव 54,526 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरतील. ही माहिती मनीकंट्रोलच्या आधारे देण्यात आली आहे. अजून काही दिवसात भारत-पाक युद्ध सुरू झाले तर किंमती काय असतील, याचा अंदाज मोठे गुंतवणूकदार वर्तवत आहेत.