Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्रमान्सूनबाबत मोठी अपडेट!! या दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार

मान्सूनबाबत मोठी अपडेट!! या दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार

सध्या कडक उन्हाळ्यामुळे सर्वच जण गर्मीने हैराण झाले आहेत. तरीही राज्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गर्मी पासून काही प्रमाणात सुटका मिळालीय.. त्यातच आता थेट अंदमान निकोबार बेटावरून मान्सूनबाबत (Monsoon 2025) आनंदाची बातमी समोर आलीय. यंदा वेळे आधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा ला नीना प्रभाव आणि हिंद महासागर द्विध्रुव (IOD) यामुळे मान्सून वेळेआधी दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजासाठी हि सुखावणारी बाब आहे.

 

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार- Monsoon 2025

हवामान अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार यंदा वेळेआधीच मान्सून निकोबार बेटांवर दाखल होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर मागील काही दिवसांपासून ढगांच्या हालचाली वेगानं सुरू असून वाऱ्याच्या वेगातही सातत्यपूर्ण बदल पाहायला मिळत आहे. खरं तर साधारणपणे, नैऋत्य मान्सून १ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो, परंतु यंदा ला नीना प्रभाव आणि हिंद महासागर द्विध्रुव यामुळे मान्सून वेळेआधी दाखल होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. परंतु यंदा २८ मे ते ३ जून दरम्यान मान्सूनची केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये एक जूनला तर मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ८ जूनपर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा लवकर तयार होईल. त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला (Monsoon 2025) वेग येऊ शकतो.

 

भारतीय हवामान खात्यानं यंदा १०५ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. महाराष्ट्राबाबत सांगायचं झाल्यास, यंदा महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. कोकणात १०-११ जूनपासून पाऊस सुरू होण्याची शक्यता असून जुलै-ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात १५ ते १८ जूनपासून पावसाला सुरुवात होऊ शकते. यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे शेतीला फायदा होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -