भारतीय लष्कराकडून 15 दिवसात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेण्यात आला. अवघ्या 23 मिनिटांत भारतीय सैन्यदलांकडून ऑपेरशन सिंदूर फत्ते करण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 2 टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात आला आहे. मुरिदकेच्या मरकझ तय्यबा मशिदीवरील हल्ल्यात अब्दुल मलिक आणि मुदस्सीर ठार झाल्याची माहिती मिळत आहे. फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे जबरदस्त कामगिरी केली. स्काल्प क्षेपणास्त्रांचा अचूक मारा करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया-
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चांगलाच घाबरल्याचे दिसून आले. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारतानं कारवाई थांबवली तर पाकिस्तान देखील पाऊल उचलणार नाही, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ म्हणाले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ काय म्हणाले?
भारताच्या या कारवाईवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची शहबाझ शरीफ यांनी पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी भारतानं काही ठिकाणांवर हल्ले केले आहेत. भारताकडून करण्यात आलेल्या युद्धासारख्या कृतीचं जोरदार उत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे. जोरदार उत्तर दिलं जाईल. संपूर्ण पाकिस्तानी देश सशस्त्र दलांसोबत उभा आहे. पाकिस्तान देशाचं मनोबल उच्च आणि भावना देखील जोरात आहेत. पाकिस्तानी राष्ट्र आणि पाकिस्तानी लष्कर चांगल्या प्रकारे जाणते की दुश्मनांचा सामना कशा प्रकारे करावा. दुश्मन त्यांच्या इराद्यामध्ये यशस्वी होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया शहबाझ शरीफ यांनी दिली.
भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक? (India Air Strike On Pakistan)
1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर
2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर
3. सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर
4. गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी 5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर
6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.
7. बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर
8. सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर
9. महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर