Friday, January 30, 2026
Homeदेश विदेशऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील ‘ही’ विमानतळे बंद; लगेच चेक करा हे

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील ‘ही’ विमानतळे बंद; लगेच चेक करा हे

भारताने जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत. या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असं नाव देण्यात आल असून पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील अनेक भागात क्षेपणास्त्रे डागली आहेत. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सुद्धा चवताळला आहे. दोन्ही देशातील संबंध आणखी तणावाचे झाले आहेत. भारताच्या एअर स्ट्राईक नंतर सीमाभागात पाकिस्तानकडून मंगळवारी रात्रीपासूनच कुरापती वाढल्या आहेत. शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यासोबतच पाककडून सातत्यानं भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी काही महत्त्वाच्या आणि स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत.

 

याबाबत इंडिगो एअरलाइन्सने एक एडवाइजरी जारी केली आहे की, एअरस्पेसमध्ये होणाऱ्या बदलांच्या अनुषंगानं श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगढ आणि धरमशाला येथील ये-जा करणाऱ्या सर्व फ्लाईट अर्थात उड्डाणं प्रभावित होणार असल्याचं सांगितलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -