Tuesday, July 22, 2025
Homeदेश विदेशअखेर हाजीपूरच्या महिलांची ‘ती’ प्रतिज्ञा पूर्ण, भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करताच लावलं...

अखेर हाजीपूरच्या महिलांची ‘ती’ प्रतिज्ञा पूर्ण, भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करताच लावलं कुंकू

22 एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट होती. या घटनेमुळे अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं होतं. त्यामुळे ज्यांनी या महिलांचं कुंकू पुसलं तो मरत नाही, आपला बदला पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुंकू लावणार नाही अशी प्रतिज्ञा हाजीपूरच्या महिलांनी केली होती. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे एकूण 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, भारतानं पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे, त्यानंतर आता हाजीपूरच्या महिलांनी आपल्या कपाळाला कुंकू लावलं आहे.

 

भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर हाजीपूरच्या गांधी आश्रमातील महिलांनी एकमेकिंना कुंकू लावून आनंद साजरा केला आहे. आज आमचा बदला पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीनं भारतीय लष्कराने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले ते पाहून मनाला खूप बरं वाटलं, अशी प्रतिक्रिया या महिलांनी दिली आहे. तसेच या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी एक पत्र देखील लिहिलं आहे.

 

भारतानं मध्यरात्रीच्या सुमारास पीओके आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 5 तर पाकिस्तानमधील 4 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यामध्ये एकाही पाकिस्तानमधील सामान्य नागरिकाची जीवितहानी झालेली नाही, मात्र भारतानं ज्या ठिकाणी हल्ले केले तिथे दहशतवाद्यांचे अड्डे नव्हतेच, या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे 26 लोक मारले गेले तर 46 जण जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. तसेच आम्ही भराताचे पाच लढाऊ विमानं पाडल्याचा दावा देखील पाकिस्ताननं केला आहे. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानला चांगलीच धडकी भरल्याचा चित्र आहे. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -